E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युरोपातील देशांत वीजपुरवठा खंडीत
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
मेट्रो, हवाई सेवेवर परिणाम
पोर्तुगाल : युरोपातील अनेक देशांमध्ये वीजेचे गंभीर संकट निर्माण झाले असून, स्पेन आणि पोर्तुगालसह अनेक भागांत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे हवाई सेवांपासून ते मेट्रोसारख्या विविध वाहतुकीच्या सोयींवर याचा परिणाम झाला आहे. सुरुवातीला माद्रिद ते लिस्बनपर्यंतचा मोठा भाग अंधारात होता. या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी तात्काळ प्रोटोकॉल लागू केला आहे. सध्या यामागील कारण शोधले जात असून, हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे.
स्पेनच्या राष्ट्रीय ग्रिड ऑपरेटर ’रेड इलेक्ट्रिका’ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे, की देशभरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहकार्याने अनेक ठोस पावले उचलली जात आहेत. दरम्यान, पोर्तुगालच्या ग्रिड ऑपरेटर ’ई-रेड्स’ ने सांगितले, की युरोपियन पॉवर ग्रिडमधील समस्येमुळे हे संकट उद्भविले आहे. सुरुवातीच्या तपासात, व्होल्टेज असंतुलन ही वीज प्रणाली पूर्णपणे कोलमडण्याचे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
या ’ब्लॅकआउट’मुळे ट्रॅफिक लाईट बंद पडले आणि मेट्रोसेवा थांबल्या, ज्यामुळे रस्त्यांवर गोंधळ उडाला. रुग्णालयांमधील अत्यावश्यक सेवा बॅकअप जनरेटरच्या मदतीने चालवल्या जात आहेत, परंतु अधिकार्यांनी रुग्णालयातील कर्मचार्यांना संगणक बंद करण्याचे आणि वीज वाचवण्यासाठी इतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या तरी हे संकट किती काळ राहील याबाबत स्पष्टता नाही. परिस्थिती हाताळण्यासाठी स्पेनमध्ये एक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.
सायबर हल्ल्याची शक्यता
स्पॅनिश अधिकार्यांनी म्हटले आहे, की ब्लॅकआउटचे कारण आतापर्यंत सायबर हल्ला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची सखोल चौकशी केली जात आहे. याआधीही युरोपमध्ये किरकोळ तांत्रिक बिघाडांमुळे मोठे ब्लॅकआउट झाले आहेत. २००३ मध्ये, स्वित्झर्लंडमध्ये एका झाडामुळे वीज तार तुटल्याने संपूर्ण इटली अंधारात बुडाली होती. त्यामुळे यावेळीही तांत्रिक समस्या किंवा सायबर हल्ला या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. युरोपियन कमिशनने गेल्या अनेक वर्षांपासून देशांमधील ऊर्जा प्रणालीच्या चांगल्या एकत्रीकरणाच्या गरजेवर भर दिला आहे, परंतु याची प्रगती सध्या मंदावली आहे. त्यामुळे या संकटाने युरोपला पुन्हा एकदा या दिशेने गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडले आहे.
Related
Articles
पूंछ, राजौरीत सीमेपलीकडून गोळीबार, तोफगोळे डागले
10 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!
13 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली ७१ हल्ल्यांची जबाबदारी
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
पूंछ, राजौरीत सीमेपलीकडून गोळीबार, तोफगोळे डागले
10 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!
13 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली ७१ हल्ल्यांची जबाबदारी
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
पूंछ, राजौरीत सीमेपलीकडून गोळीबार, तोफगोळे डागले
10 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!
13 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली ७१ हल्ल्यांची जबाबदारी
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
पूंछ, राजौरीत सीमेपलीकडून गोळीबार, तोफगोळे डागले
10 May 2025
वीजेचा धक्का बसलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू
15 May 2025
रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा!
13 May 2025
विंदाचे काव्यसंग्रह जीवनाला दिशा देणारे
15 May 2025
बलुच लिबरेशन आर्मीने स्वीकारली ७१ हल्ल्यांची जबाबदारी
13 May 2025
इस्लामचा वापर करुन दहशतवादी कारवाया
11 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
2
जातींची नोंद काय साधणार?
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
5
भारताने ताकद दाखवली
6
व्यापार युद्धाचा चीनला फटका